Adarsh Patasanstha Loader
Adhane Patil Chief admin of Adarsh Nagari Sahakri Patasanstha Aurangabad
श्री. डी. एस. अधाने पाटील
मुख्य व्यवस्थापक

मुख्यव्यवस्थापक संदेश

आदर्श नागरी सहकारी पतसंस्था मर्या. औरंगाबाद या संस्थेची दिनांक १९/०४/२००३ रोजी स्थापना झाली. स्थापनेपासून संस्थेकडून छोटया-मोठ्या प्रमाणात ठेवी गोळा करून संस्थेच्या इच्छुक सभासदांना कर्जपुरवठा केला जातो. यामधून संस्थेला किराणा दुकानदार, छोटे व्यावसायिक, शेतकरी, दुग्धव्यवसाय करणारे, भाजीपाला विक्रेते अशा अनेक घटकांमधून ग्राहक जोडण्यात आले व संस्थेच्या विविध ठेव योजनांतून संस्थेला व्यवहार वाढविण्यास मदत झाली. संस्थेने एका शाखेतून सुरुवात करून ग्राहकांच्या अपेक्षेप्रमाणे औरंगाबाद जिल्हात १९ ठिकाणी शाखा व कार्यालये ग्राहकांच्या तत्पर सेवेसाठी सुरू करण्यात आली. ग्राहकांसाठी विविध कर्ज योजना राबविण्यात आल्या आहेत. संस्थेच्या सर्व शाखा संगणकीकृत करण्यात आलेल्या आहेत. संस्थेचे सर्व कर्मचारी व पदाधिकारी व मा. संचालक मंडळ यांच्या अमूल्य सहकार्यामुळे संस्थेची उत्तरोत्तर प्रगती वेगाने होत आहे. पुढील काळासाठी औरंगाबाद जिल्ह्यातील सर्व ग्राहकांना सेवा पुरविण्याचे उद्दिष्ट, शाखा व कार्यालयाचे धोरण अवलंबिण्यात येणार आहे. संस्थेचे ठेवीदार, सभासद व हितचिंतक यांनी जे आम्हाला मोलाचे सहकार्य केले आहे, त्याबद्दल मी सर्वांचा आभारी आहे.

धन्यवाद.
TOP