Adarsh Patasanstha Loader

आदर्श संचय बचत ठेव योजना

१२ महिने - ०५ टक्के, ३६ महिने - ०६ टक्के, ४९ महिने - ०७ टक्के, ६० महिने - ०८ टक्के

एका वेळी कमीत कमी १० किंवा दहाच्या पटीत रक्कम स्वीकारण्यात येईल.

सर्वसामान्य व्यक्तींना अथवा फर्मना वैयक्तिक, संयुक्तिक अथवा फर्मचे नावावर पालनकर्ता म्हणून आई / वडील, (आई / वडील नसल्यास) यांना खाते उघडता येईल.

खातेदाराच्या दुकानात अथवा घरी जाऊन दररोजच्या भरणा स्वीकारण्याची व्यवस्था संस्था शक्यतो प्रतिनिधी मार्फत उपलब्ध करण्यात येईल. अशा अधिकृत प्रतिनिधीजवळच निधी वसूल करण्याबद्दल पतसंस्थेचे अधिकारपत्र असेल. खातेदाराने अधिकृत प्रतीनिधीशिवाय अन्य चुकीच्या व्यक्तीजवळ भरणा दिल्यास त्याची जबाबदारी पतसंस्थेवर राहणार नाही. जेथे (ज्या विभागात) घरोघर जाऊन भरणा स्वीकारण्याची व्यवस्था पतसंस्थेने केली नसेल तेथील खातेदारास स्वतःचा भरणा पतसंस्थेत दररोज स्वतः भरण्याच्या अटीवर खाते सुरु करण्यात येईल.

अ) खातेदारास मूळ अर्जात दिलेल्या मुदतीपूर्वी अपरिहार्य कारणासाठी खाते सुरु झाल्यानंतर सहा महिन्यांचा आत बंद करावयाचे असल्यास खाते बंद म्हणून रु. ५० खातेदाराकडून कपात करून खाते बंद करण्यात येईल व रक्कम बिनव्याजी परत केली जाईल.

ब) खातेदारास खाते सुरु झाल्यापासून सहा महिन्यानंतर परंतु एक वर्षाच्या आत काही अपरिहार्य कारणासाठी रक्कम हवी असल्यास ती बिन व्याजी परत मिळेल.

सदर ठेवीवर दिलेल व्याज कमीत १ रुपया असली पाहिजे. त्याहून कमी असणारी रक्कम खातेदारास दिली जाणार नाही.

खात्याची मुदत संपल्यानंतर घोषित रक्कम खातेदाराने न उचलल्यामुळे पतसंस्थेकडून त्या खात्यावरील प्रचलित व्याज दराने व्याज दिले जाईल.

ठेविदाराच्या वैयक्तिक अगर संयुक्त नावाच्या खात्यावरील रक्कम पतसंस्थेला अशा ठेविदाराकडून येणे असलेल्या कोणत्याही कर्जापोटी कि जे संपूर्णतः किंवा अंशतः तारणावर असले तरी देखील त्या रकमेपोटी वर्ग करण्याचा अधिकार पतसंस्थेस राहील व ठेवीदारांना बंधनकारक राहील.

सदर आदर्श संचय ठेव योजनेच्या नियमात केव्हाही बदल करण्याचा / वाढ करण्याचा / दुरुस्तीचा हक्क पतसंस्थेने राखून ठेवला आहे व ते बदल खातेदारावर बंधनकारक राहतील.

TOP