Adarsh Patasanstha Loader

आदर्श नागरी सहकारी पतसंस्थेमध्ये आपले स्वागत आहे.

आदर्श नागरी सहकारी पतसंस्था मर्या. औरंगाबाद या संस्थेची स्थापना दिनांक १९/०४/२००३ रोजी झाली. संस्थेची सुरुवात ३०० मुख्य व्यवस्थापक आणि ३ लक्ष रुपये भागभांडवलापासून झालेली आहे. संस्थापक अध्यक्ष मा. सहकाररत्न अंबादास मानकापे दादा यांनी ३०० सभासदांना घेऊन संस्थेची सुरुवात केली. संस्थेचे कार्यक्षेत्र हे औरंगाबाद जिल्हा असून संस्थेचे कामकाज सभासदांमधून लोकशाही पद्धतीने, ठरावाव्दारे सर्वसंमतीने चालते.

दर पाच वर्षानंतर लोकशाही मतदान पद्धतीने सभासदांमधून संचालक मंडळाची निवड करण्यात येते. संचालकांच्या निवडीतून अध्यक्ष, उपाध्यक्ष व सचिवांची निवड होते. संस्था सुरु झाल्यापासून दरमहा संचालक मंडळ सभा नियमित घेण्यात येतात आणि दर महिन्याचे संस्थेचे विषय यामध्ये मांडण्यात येऊन सर्व संचालक मंडळाची त्यास मान्यता घेण्यात येते. मगच ठराव मंजूर झाल्यानंतर त्याची अंमलबजावणी करण्यात येते. संस्थेच्या विकासाबाबतचे नियोजन ठरविले जाते.

संस्थेची ठळक वैशिष्ट्ये

 • संस्थेचे कार्यक्षेत्र हे औरंगाबाद जिल्हा आहे.
 • स्वभांडवलावर उभी असलेली पतसंस्था.
 • इतर संस्थांच्या तुलनेत जास्त व्याज दिले जाते.
 • ज्येष्ठ नागरिकांना ठेवीचे व्याज दरमहा घरपोच दिले जाते.
 • संस्थेच्या पिग्मी ठेव प्रतिनिधींना मासिक रु. २,००,०००/- जमा केल्यास महिनाअखेर रु. १०००/- प्रोत्साहनपर रक्कम बक्षीसरूपाने दिली जाते.
 • महिला बचतगटांना प्राधान्याने कर्जवाटप.
 • 'संत गाडगेबाबा ग्रामीण स्वच्छता अभियान' शौचालय बांधकामासाठी कर्जपुरवठा.
 • बचतगटाचे सेव्हिंग्ज खाते रु. १००/- एवढी रक्कम भरणा करून उघडले जाते.
 • माजी सैनिकांना शौचालय बांधकामासाठी प्राधान्याने अल्प व्याजदराने कर्जपुरवठा.
 • संस्थेच्या सर्व शाखा व कार्यालये संगणकीकृत करण्यात आली आहेत. ती मुख्य कार्यालयाशी जोडण्यात आलेली आहेत.

संस्थेची आर्थिक परिस्थिती मार्च २०१९ अखेर

 • सभासद संख्या : ६१०७
 • भाग भांडवल : ७,६१,८१,११६,९१
 • कर्जे : १६७,६५,५३,९८२,०४
 • एन.पी.ए. : २,८६,०६,०९४
 • नफा : २९,५६,१५६,७२
 • संस्थेची गुंतवणूक : ४०,४९,१५,२०९,००
 • पतसंस्थेच्या २१ शाखा कार्यान्वित व १ मुख्य कार्यालय.
TOP